रेगे, सदानंद शांताराम (२१ जून १९२३ ते २१ सप्टेंबर १९८२) कवी, कथाकार, अनुवादक. जन्म : राजापूर (जिल्हा- रत्नागिरी) येथे आजोळी. पुढचे सर्व आयुष्य मुंबईत.
१९४० साली दादरच्या छबिलदास हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये. परंतु परिस्थितीमुळे ते शिक्षण सोडून १९४२पासूनच नोकरीस सुरुवात. सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या. १९५८ साली बी.ए.
१९५१ साली 'धनुर्धारी'त पहिली कथा. १९४८ साली 'अभिरुची'त पहिली कविता. हयातीत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली.
रेग्यांची कविता काहीशा विक्षिप्त, विदुषकी पद्धतीने विश्वाविषयीचे आपले आकलन कधी चिंतनशील होऊन, कधी भाष्य वा प्रतिक्रिया प्रकट करीत व्यक्त करते.

संक्षिप्त वाङ्मय कोश, पॉप्युलर प्रकाशन - यातून ही छोटीशी नोंद काढलेय. बाकीचं ब्लॉगमधील नोंदींमध्ये आहेच.

Saturday, September 30, 2017

रेग्यांची चित्रं

सदानंद रेग्यांना रंगरेषांचीही स्वप्नं पडायची आणि ती ते प्रत्यक्षातही कागदावर उतरवायचे. त्यांनी 'वाङ्मयशोभा' मासिकात १९५६-५७च्या दरम्यान काढलेली तीन व्यंग्यचित्रं उदाहरणादाखल खाली चिकटवली आहेत. अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी यांच्या 'आन्याची फाटकी पासोडी'/ 'लूकिंग अॅट कार्टून्स, गेटिंग अलाँग' (searchingforlaugh.blogspot.in) या ब्लॉगवरून ही चित्रं त्यांच्या परवानगीनं इथं नोंदवतो आहे. मुळात 'बुकगंगा-डॉट-कॉम'वर 'वाङ्मयशोभे'च्या अंकांमध्ये ही चित्रं त्यांना सापडल्याचं नोंद त्यांनी केली आहे. अशा सगळ्यांना ही चित्रं इथं असण्याचं श्रेय आहे.




रेग्यांची आणखी काही व्यंग्यचित्रं आणि त्यासंबंधी काही टिप्पणी कुलकर्ण्यांच्या ब्लॉगवर जाऊन इच्छुकांना वाचता येईल.

मित्र